मराठी प्रकाशक संघाकडून सावानाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:03+5:302021-09-25T04:15:03+5:30
नाशिक : सावानाने कोरोना काळात प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा विशिष्ट विभागातील प्रथम पुरस्कार मिळाला ...

मराठी प्रकाशक संघाकडून सावानाचा सन्मान
नाशिक : सावानाने कोरोना काळात प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा विशिष्ट विभागातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे. संघाच्या नाशिक शाखेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान सोहळा सावानाच्या कै. वा.गो. कुलकर्णी कलादालनात करण्यात आला. प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रकाशक विलास पोतदार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
साहित्य सावानाच्या संपादक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी तो स्वीकारला. सावाना दिवाळी अंकाचे संपादक जयप्रकाश जातेगावकर यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत दिवाळी अंकाला मिळालेला पुरस्कार हे सावानाच्या संपूर्ण कार्यकारिणीने केलेल्या कष्टाला मिळालेले फळ असल्याचे सांगितले. या वर्षीदेखील असाच दर्जेदार अंक प्रकाशित करू असेही त्यांनी नमूद केले. यावेळी पुरस्कारार्थी प्राजक्त देशमुख यांचा संदेश सुभाष सबनीस यांनी वाचून दाखविला. नाशिकचे युवा कवी प्रशांत केंदळे यांना ‘गुलमोहराचे कुकू’ आणि कवी राजेंद्र उगले यांच्या ‘थांब नारे ढगोबा’ या बालकवितासंग्रहाला गदिमा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या दोघांचाही प्रकाशक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास पोतदार यांनी केले. यावेळी वसंत खैरनार यांनीही प्रकाशक संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महेंद्र देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.