सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

By Admin | Updated: July 13, 2015 23:16 IST2015-07-13T23:15:18+5:302015-07-13T23:16:10+5:30

मालेगाव : आदिवासींवरील हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

Satyashodhak Grameen Sadak Sabha rally | सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

 मालेगाव : तालुक्यातील सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे सोमवारी दुपारी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. संगमेश्वरातून दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकऱ्यांनी प्रारंभी एक तास पोलीस नियंत्रण कक्ष आवारात ठाण मांडले होते. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी मोहपाडे
येथे आदिवासींवर हल्ला करणाऱ्यांवर आदिवासी प्रतिबंधक अत्याचार कायद्याखाली कारवाई करून आरोपींना अटक करावी, जखमींना शासकीय मदत
मिळावी, अपात्र वनदाव्यांची उपविभागीय स्तरावर फेरतपासणी करण्यात यावी, तालुक्यातील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करावी, रावळगाव
येथील शेती महामंडळाची जागा भूमिहीनांना द्यावी, हरण शिकार, उंबरदे, झाडी आदि ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा आदि मागण्या केल्या. यावेळी नेत्यांची भाषणे झाली. मोर्चात किशोर ढमाले, राजेंद्र अहिरे, अर्जुन ठाकरे, उत्तम निकम, मन्साराम पवार,
छोटू नवरे, धनराज पवार, कारभारी पवार, आत्माराम माळी, यमुनाबाई माळी, रंजनाबाई ठाकरे, जिजाबाई सोनवणे आदिंसह सभासद सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Satyashodhak Grameen Sadak Sabha rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.