शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:28 IST

गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धा : जलसंधारण, मृदसंधारणाचे होणार कामेग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखाचे बक्षिस पटकाविण्याची संधी

नाशिक : सिने अभिनेता अमीर खान यांच्या ‘पाणी फाऊंडेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणी टंचाईचा सामना करणा-या चांदवड व सिन्नर या दोन तालुक्याची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पाणी फाऊंडेशनच्यावतीने ‘वॉटर कप’स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखाचे बक्षिस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.गेल्या दोन वर्षापासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाचे विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृष्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाऊंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाचे अधिकाधिक चांगली कामे करणा-या राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात कायमच टंचाईला सामोरे जावे लागणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणा-या ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाणी फाऊंडेशनला सादर करावा लागणार आहे. सहभागी होणा-या ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावेही फाऊंडेशनला कळवायची असून, फाऊंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यात जवळपास ४५ ते ५० ठिकाणी फाऊंडेशन प्रशिक्षण सेंटर सुरू करणार आहे, या शिबीरात सहभागी होणा-या शिबीरार्थींचा प्रवास, राहण्याची खाण्याची व निवासाची सोय फाऊं डेशन करणार असून, शिबीरार्थींना कामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.येत्या ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसाच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाºया ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाचे कामे करायची आहेत, या कामांसाठी मात्र फाऊंडेशन कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. त्यासाठी लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातुन ही कामे पुर्ण करावी लागणार असून, पाणी फाऊंडेशन या स्पर्धेचा निकाल घोषित करेल. राज्यात पहिल्या येणाºया तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखाचे पारितोषित दिले जाणार आहे. तालुक्यात पहिल्या येणाºया ग्रामपंचायतीला १० लाख बक्षिस देण्यात येईल.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक