जिल्हा बॅँक सभागृहात शनिवारी हौसिंग दरबार

By Admin | Updated: August 15, 2014 00:37 IST2014-08-14T21:16:01+5:302014-08-15T00:37:54+5:30

जिल्हा बॅँक सभागृहात शनिवारी हौसिंग दरबार

Saturday's Housing Court in District Bank House | जिल्हा बॅँक सभागृहात शनिवारी हौसिंग दरबार

जिल्हा बॅँक सभागृहात शनिवारी हौसिंग दरबार

 

नाशिक : महाराष्ट्र राज्य हौसिंग फेडरेशन, नाशिक जिल्हा हौसिंग फेडरेशन व उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तालुका यांच्या वतीने येत्या शनिवारी (दि. १६) हौसिंग दरबार सीबीएसजवळील जिल्हा बॅँकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आला आहे.
या हौसिंग दरबारमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा व शंकांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच विविध तक्रारींवर सुनावणीही होणार असल्याचे कळविण्यात आले आहे. सभासदांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकारी संस्थेच्या उपनिबंधकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Saturday's Housing Court in District Bank House