सातपूरच्या जुगार अड्ड्यावर छापा
By Admin | Updated: October 18, 2015 23:23 IST2015-10-18T23:22:55+5:302015-10-18T23:23:29+5:30
सातपूरच्या जुगार अड्ड्यावर छापा

सातपूरच्या जुगार अड्ड्यावर छापा
नाशिक : सातपूर परिसरतील नासर्डी नदीपुलाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या पाच अट्टल जुगाऱ्यांना सातपूर पोलिसांनी अटक केली आहे़
शनिवारी (दि़१७) दुपारी अडीच ते दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नदीपात्रालगत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ या ठिकाणी छापा टाकून जुगार खेळणारे संशयित अनिल एकनाथ गुंजाळ (४०), योगेश मोहन दातार (४१), अमोल बुधाजी दातार (२४), राज अशोक गांगुर्डे (२६)
(सर्व रा. महादेववाडी, सातपूर) यांना अटक केली़
या पाचही संशयितांवर
सातपूर मुंबई जुगार कायद्यान्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)