दुचाकी अपघातात सातपूरचा तरुण ठार

By Admin | Updated: November 9, 2015 00:32 IST2015-11-09T00:32:19+5:302015-11-09T00:32:35+5:30

दुचाकी अपघातात सातपूरचा तरुण ठार

Satpur youth killed in a two-wheeler crash | दुचाकी अपघातात सातपूरचा तरुण ठार

दुचाकी अपघातात सातपूरचा तरुण ठार

नाशिक : सातपूरहून सीबीएसकडे येत असताना झालेल्या अपघातात सातपूरमधील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव दिनेश धर्माजी अहिरे (३०, रा़ कामगारनगर, सातपूर) असे आहे़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि़ ७) रात्री एक वाजेच्या सुमारास दिनेश अहिरे हे दुचाकीवरून सीबीएसला येत होते़ त्र्यंबकरोडवरील वेद मंदिरासमोरून येत असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व ते दुभाजकाला जाऊन धडकले़ यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Satpur youth killed in a two-wheeler crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.