विनाकारण फिरणाऱ्यांवर सातपूर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST2021-04-18T04:14:19+5:302021-04-18T04:14:19+5:30

सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर चौकात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते ...

Satpur police action against unruly wanderers | विनाकारण फिरणाऱ्यांवर सातपूर पोलिसांची कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर सातपूर पोलिसांची कारवाई

सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर चौकात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या, विना मास्क, विनाकारण सार्वजनिक रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यात ५० नागरिकांची अशोकनगर चौकात अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना ठक्कर डोम येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. यापुढेही सातपूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असून कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी केले आहे.

(फोटो १७ सातपूर) विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर सातपूर पोलिसांकडून अँटिजन चाचणीची कारवाई करण्यात आली.

Web Title: Satpur police action against unruly wanderers