सातपूर प्रभाग सभापतिपदी भाजपाच्या माधुरी बोलकर विजयी
By Admin | Updated: May 19, 2017 17:26 IST2017-05-19T17:26:32+5:302017-05-19T17:26:32+5:30
सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनसेच्या दोघा नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय संपादन केला.

सातपूर प्रभाग सभापतिपदी भाजपाच्या माधुरी बोलकर विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मनसेच्या दोघा नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याने भाजपाच्या माधुरी बोलकर यांनी दोन मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांचा पराभव झाला. २५ वर्षांनंतर प्रथमच सातपूरमध्ये भाजपाचा प्रभाग सभापती विराजमान होत आहे.