सातमाने रस्त्यावर एकास चौघांनी दीड लाखांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:14 IST2021-04-02T04:14:39+5:302021-04-02T04:14:39+5:30

मालेगाव : तालुक्यातील वायगाव - सातमाने शिवारात कंपनीचे काम आटोपून रावळगावहून सटाणा येथे दुचाकीवर जात असताना चार चाकी ...

Satmane looted Rs 1.5 lakh on the road | सातमाने रस्त्यावर एकास चौघांनी दीड लाखांना लुटले

सातमाने रस्त्यावर एकास चौघांनी दीड लाखांना लुटले

मालेगाव : तालुक्यातील वायगाव - सातमाने शिवारात कंपनीचे काम आटोपून रावळगावहून सटाणा येथे दुचाकीवर जात असताना चार चाकी वाहनातील चौघांनी दीड लाखाचा ऐवज लुटून नेला. बुधवारी (दि.३१) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नीलेश शंकर दांगडे (२४) व्यवसाय खासगी नोकरी (रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव. हल्ली रा. आर. एन. सर्व्हिस स्टेशन पुढे ग्रामीण कुटा सर्व्हिसेस यांचे कार्यालय मालेगावरोड सटाणा) यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी चारचाकी वाहनावरील चार अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. फिर्यादी नीलेश दांगडे कंपनीचे काम आटोपून महिला बचत गटाचे वसूल केलेले एक लाख ३९ हजार ५०० रुपये रोख, पॅन्टच्या खिशातील ४०० रुपये रोख आणि १० हजारांचा भ्रमणध्वनी संच असा एकूण एक लाख ४९ हजार ४०० रुपये घेऊन सटाणा येथे दुचाकीवर जात होते. सातमाने रस्त्याच्या कडेला लाल रंगाच्या चारचाकी वाहनातील चार अज्ञात चोरट्यानी दांगडे यांना दुचाकीवरून उतरवून चारचाकी वाहनात बसविले. हात पाय बांधून आणि तोंड चिकटपट्टीने बांधले. सातमाने रस्त्याने अजंगकडे वाहन नेताना मोबाइल आणि रक्कम बळजबरीने लुटून फिर्यादीस गाडी खाली फेकून पसार झाले. वडनेर खाकुर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मोताळे करीत आहेत.

Web Title: Satmane looted Rs 1.5 lakh on the road