शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

नाशिकच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 12:02 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.

नाशिक- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत.आज सकाळी झालेल्या निवडणुकीत सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपाला साथ दिली. त्याचप्रमाणे भाजपाच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत भाजपाला पाठिंबा केल्याने भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.राज्यात होत असलेल्या महाशिवआघाडीप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यातच भाजपाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने सध्या शिवसेनेत असलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले 10 ते 15 भाजपा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले होते, त्यामुळे 65 नगरसेवक असूनही भाजपा अडचणीत आली होती, मात्र मनसेने भाजपला पाठिंबा दिला तर महाशिवआघाडीत असलेल्या काँग्रेसने उपमहापौरपदावर दावा केल्याने वाद वाढला आणि महाशिवआघाडी फुटली. त्यामुळे भाजपाचा विजय सुकर झाला.

नाशिक महापालिकेत महाशिवआघाडीचा प्रयोग फसल्यानंतर महापौर पदापाठोपाठ उपमहापौरपदी याच पक्षाच्या भिकुबाई किसन बागुल यांची बिनविरोध निवड झाली.  उपमहापौरपदासाठी एकूण 11 अर्ज दाखल झाले होते. सर्वांनी माघार घेतल्याने बागुल यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका