इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:17 IST2021-09-06T04:17:58+5:302021-09-06T04:17:58+5:30
घोटी इगतपुरीच्या बाजारपेठा बैलांसाठी लागणाऱ्या सजावटीच्या विविध साहित्यांनी सजल्या आहेत. यामुळे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. ...

इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस
घोटी इगतपुरीच्या बाजारपेठा बैलांसाठी लागणाऱ्या सजावटीच्या विविध साहित्यांनी सजल्या आहेत. यामुळे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, वर्षभर काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या मुक्या सर्जा-राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून पोळ्याच्या सणाला विशेष महत्त्व असते. त्यामुळे हा सण सण साजरा करण्यासाठी बळीराजाही सज्ज झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे शेती आहे ते पोळ्याच्या मुहूर्तावर आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ मानून बैलजोडीची पूजा करतात तसेच या दिवशी सुवासिनींकडून बैलांची विधिवत पूजा करून औक्षण केले जाते.
यंदाच्या हंगामात तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस, वेळेवर झालेली शेतीची कामे आणि आबादानी लक्षात घेता तालुक्यातील खेड्यापाड्यासह ग्रामीण भाग व शहरी भागातही उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.
पीओपीचे बैल ठरताहेत आकर्षण
पूर्वी पोळा सण आणि सणासाठी घराघरात मातीचे बैल हे एक समीकरणच होते. आजही ते कायम असले तरी कालानुरूप यातही बदल झाल्याचे दिसून येत आहे. जुन्या व्यावसायांना आधुनिक काळात किंमत राहिली नाही म्हणून आधुनिक काळात मातीची जागा पीओपीने घेतल्याने मातीच्या बैलांऐवजी पीओपीचे बैल आकर्षण ठरत आहेत, यामुळे आकारा आणि प्रकारानुसार किंमतही मोजावी लागते. सध्या पन्नास रुपये ते तीन हजारांपर्यतचे बैल बाजारपेठेत दाखल झाले आहेत.
कोट...
गेल्या वर्षापेक्षा यंदा शेतीबाबत समाधानकारक वातावरण आहे. पोळ्याबद्दल उत्साह दिसून येत आहे. निसर्गाने अशीच कृपा कायम ठेवावी यामुळे मनाला खूपच आनंद वाटतो.
- भाऊसाहेब मुसळे, शेतकरी, नांदूरवैद्य.
(०५ गोंदे दुमाला) इगतपुरी तालुक्यात पोळा सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत बैलांना सजविण्याकरिता लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी अशी गर्दी होत आहे.
050921\05nsk_19_05092021_13.jpg
इगतपुरी तालुक्यात पोळा सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत बैलांना सजविण्याकरीता लागणाऱ्या साहीत्य खरेदीसाठी अशी गर्दी होत आहे.