पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:19 IST2021-08-19T04:19:07+5:302021-08-19T04:19:07+5:30
एवढा आठवडा जर पाऊस आला नसता तर खरीप हंगामातील पिके जवळ जवळ संपुष्टात आली होती. मात्र या पावसाने या ...

पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांमध्ये समाधान
एवढा आठवडा जर पाऊस आला नसता तर खरीप हंगामातील पिके जवळ जवळ संपुष्टात आली होती. मात्र या पावसाने या पिकांवर वेळेवर फुंकर मारल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा काळ लोटला असतानादेखील या भागात पावसाने पूर्ण पाठ फिरवली होती. शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर कर्ज काढून विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर खरीप पिकांची लागवड केली होती. पिके मोठी होत असताना त्यावर पुन्हा अळीने हल्ला करून शेतकऱ्यांना वेगवेगळे कीटकनाशके मारणे भाग पाडले. पिके पावसाअभावी मरगळली होती. पाऊस काही येईना, मात्र शेवटी मंगळवारी मध्यम गती पावसाने हजेरी लावल्याने मरणासन्न अवस्थेतील खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परिसरात अद्याप मोठा पाऊस न झाल्याने नाल्यांना पूर नाही. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.