अडचणीचा विद्युत खांब काढल्याने नागरिकांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST2021-06-22T04:10:44+5:302021-06-22T04:10:44+5:30
शहरात महावितरण कंपनीतर्फे अनेक वर्षांपूर्वी रावळगाव नाका ते भायगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विद्युत खांब वीज पुरवठ्यासाठी लावण्यात आले होते. ...

अडचणीचा विद्युत खांब काढल्याने नागरिकांमध्ये समाधान
शहरात महावितरण कंपनीतर्फे अनेक वर्षांपूर्वी रावळगाव नाका ते भायगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विद्युत खांब वीज पुरवठ्यासाठी लावण्यात आले होते. अनेक वर्षांपासून या परिसरात मोठी वस्ती, रहदारी वाढली आहे. त्यामुळे हे खांब अडचणीचे ठरत होते तर रात्री-अपरात्री या खांबांवर वाहने धडकत होती, लहान-मोठे अपघात होत होते. याच रस्त्यावर सोमवारी आठवडे बाजार भरतो तर इतर दिवशी भाजीपाला दुकानांसह अनेक व्यावसायिक येथे रस्त्यावर दुकाने थाटतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम गर्दी असते व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. येथील वंदे मातरम संघटनेसह स्थानिक नागरिकांनी तीन आठवड्यापूर्वी यासाठी उपोषण केले होते. उपोषण केल्यानंतर या समस्येचे निवारण वीज कंपनीने केले. त्यामुळे या रस्त्यावरील खांब काढून वीज पुरवठा अन्य वाहिन्यांवर स्थलांतरित करण्यात आला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
----------------------
मालेगावी कॅम्प रावळगाव नाका भागातील मुख्य रस्त्यावर अडचणीचा ठरत असलेला विद्युत खांब काढताना वीज कंपनीचे कर्मचारी. (२१ मालेगाव १)
===Photopath===
210621\21nsk_8_21062021_13.jpg
===Caption===
२१ मालेगाव १