सटाणा ते श्रीक्षेत्र मुंजवाड दिंडी सोहळा
By Admin | Updated: July 10, 2014 01:05 IST2014-07-09T21:30:27+5:302014-07-10T01:05:01+5:30
सटाणा ते श्रीक्षेत्र मुंजवाड दिंडी सोहळा

सटाणा ते श्रीक्षेत्र मुंजवाड दिंडी सोहळा
सटाणा : महाराष्ट्रातून धर्मकारणांसाठी निघणाऱ्या दिंंड्या या जातीधर्मांपलीकडे आहेत. दिंंड्यामधून संस्कार आणि मूल्यांची शिकवण मिळत असल्याने धर्म व सद्भाव वाढीसाठी दिंंडीही खऱ्या अर्थाने शिकवण देत असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ दिलीप धोंडगे यांनी केले़
बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र मुंंजवाड येथील श्री विठ्ठल-रूख्मिणी मंदिर कमिटीच्या वतीने सालाबादाप्रमाणे श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज ते श्रीक्षेत्र मुंजवाड पर्यंत पायी दिंंडी सोहळ्याचा शुभारंभ नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी प्राचार्य डॉ़ धोंडगे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी मविप्रचे उपासभापती नानाजी दळवी, दिंडी प्रमुख रामचंद्र पाटील, नगराध्यक्ष सुशीला रौंदळ, कृउबा उपसभापती राजेंद्र येवला, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड उपस्थित होते़ पहाटे बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार व सौ. नेहा पोतदार यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रूख्मिणीची महापूजा झाली. यानंतर सकाळी श्री देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरपासून श्रीक्षेत्र मुंजवाड येथे पायी दिंंडी सोहळा प्रारंभ करण्यात आला.
शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी श्रीक्षेत्र मुंजवाड येथे रवाना झाली. ठिकठिकाणी दिंंडीचे स्वागत करण्यात येत होते. भगवा ध्वज, टाळ मृदंग, चिपळ्या व भजने, भावगीते गात वारकरी दिंंडीत सहभागी झालेले होते. श्रीक्षेत्र मुंजवाड येथे दिंंडी सोहळा येताच भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत केले. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्तकेले.
या दिंंडीत मविप्र उपसभापती नानाजी दळवी, तहसीलदार अश्विनकुमार पोतदार, नगराध्यक्ष सुशीला रौंदळ, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य किशोर पवार, आदिंसह तालुक्यातील शेतकरी, वारकरी, बालगोपाळ भजनी मंडळी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश सूर्यवंशी व आभारप्रदर्शन महेश खैरनार यांनी केले.
श्रीक्षेत्र मुंजवाड येथील श्री विठ्ठल मंदिरावर यानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला होता. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
चांदवडला विविध कार्यक्रम
चांदवड : येथील गुजराथी गल्लीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
हजारो भाविकांनी फराळाचा व दर्शनाचा लाभ घेतला. आषाढी एकादशीनिमित्त सकाळी विठ्ठल-रुक्मिणीचा महाअभिषेक, पूजा, महाआरती, फराळवाटप कार्यक्रम पलोड परिवाराच्या वतीने करण्यात आला. पुरातन असे चांदवड शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर असून, दरवर्षी आषाढी, कार्तिकी एकादशी व दरमहिन्याच्या एकादशीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा व फराळाचा लाभ घेतला.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रंगमहालजवळील पुरातन श्रीगोवर्धनधारी गोपाळकृष्ण मंदिरात महापूजा महाआरती अरुण दीक्षित व सौ. रजनी दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी रंगमहालचे व्यवस्थापक एम. के. पवार, अंबादास दीक्षित व परिसरातील भाविक उपस्थित होते.