सटाणा रोटरी क्लबचे शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:14 IST2021-09-03T04:14:58+5:302021-09-03T04:14:58+5:30

बागलाण तालुक्यातील विविध शाळांमध्ये समाजाभिमुख भावनेने विद्यार्थी हितासाठी वाहून घेतलेल्या सुनील कापडणीस, अंबासन , वैशाली सूर्यवंशी, खालप फाटा, ...

Satana Rotary Club Teacher Award | सटाणा रोटरी क्लबचे शिक्षक पुरस्कार

सटाणा रोटरी क्लबचे शिक्षक पुरस्कार

बागलाण तालुक्यातील विविध शाळांमध्ये समाजाभिमुख भावनेने विद्यार्थी हितासाठी वाहून घेतलेल्या सुनील कापडणीस, अंबासन , वैशाली सूर्यवंशी, खालप फाटा, संजय गुंजाळ, फागदंर वस्ती, संदीप कोठावदे, सटाणा, शंकर राजपूत, सोमपूर हायस्कूल, अर्चना पाटील, सटाणा, शेखर दळवी, सटाणा, शैलेश देवरे, जायखेडा, प्रा. सुनील बागुल व प्रा. सुनीता शेवाळे, सटाणा या प्रातिनिधिक दहा शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक ई. टी. भामरे यांना यंदाचा रोटरी जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पाच सप्टेंबर रोजी कोविड नियमांचे पालन करत पुरस्कार ऑफलाईन व ऑनलाईन स्वरुपात विशेष प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Satana Rotary Club Teacher Award