सटाणा नाका रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:09 IST2020-02-14T22:32:18+5:302020-02-15T00:09:19+5:30
मोसमपूल ते सटाणा नाका दरम्यानच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील १२७ टपऱ्या व हातगाड्या व २५ पक्के बांधकामांवर हातोडा चालविला आहे.

सटाणा रोडवरील अतिक्रमण हटविताना मालेगाव महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक.
मालेगाव : मोसमपूल ते सटाणा नाका दरम्यानच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील १२७ टपऱ्या व हातगाड्या व २५ पक्के बांधकामांवर हातोडा चालविला आहे.
शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून केली जात होती. या मागणीची गंभीर दखल मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी घेत. शुक्रवारपासून धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजेपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोसमपूल ते अॅरोमा थिएटरदरम्यान रस्त्याच्या दोघा बाजूला असलेल्या १२७ टपºया व हातगाड्या हटविण्यात आल्या
आहेत. आस्थापना व खासगी कार्यालयांच्या २५ पायºया जेसीबीने तोडण्यात आल्या तर विनापरवानगी लावण्यात आलेले १६ फलक महापालिकेच्या पथकाने हटविले आहेत. स्वत:हून २७ जणांनी फलक काढून घेतले आहे. सहाय्यक आयुक्त तुषार अहिरे, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, अतिक्रमण विभागप्रमुख राजू खैरनार यांच्या उपस्थितीत एक जेसीबी, ३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमे -दरम्यान अतिक्रमणधारक पथकामध्ये किरकोळ वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. शनिवारीही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा घेतला धसकामहापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा अतिक्रमणधारकांनी धसका घेतला आहे. पक्के बांधकामासह रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जात आहेत. पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्ताविना शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे.