शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पालिकेच्या करात सवलतीबाबत धोरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:12 IST

सटाणा : चालू वर्षा वर्षाच्या मालमत्ता करामध्ये ५० टक्के सूट द्यावी यासाठी सटाणा नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत केलेला ठराव व नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांचे सहा महिन्याचे भाडे माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. दरम्यान शासनाच्या प्रचलीत धोरणानुसार संबधीत नगर परिषदांनी त्यांचे महसूली उत्पन्न‍ वाढवावे असे निर्देश वेळोवेळी देण्यात आलेले आहेत. सद्याच्या प्रचलीत धोरणानुसार मालमत्ता करात व गाळे भाड्यात सवलत देण्याबाबत शासनाचे धोरण नसल्याचे स्पष्ट करत तातडीने पालिकेने आकारलेला कर भरावा असे आवाहन मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देकर भरावाच लागणार : मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी केले स्पष्ट

सटाणा : चालू वर्षा वर्षाच्या मालमत्ता करामध्ये ५० टक्के सूट द्यावी यासाठी सटाणा नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत केलेला ठराव व नगरपरिषदेच्या मालकीच्या गाळेधारकांचे सहा महिन्याचे भाडे माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. दरम्यान शासनाच्या प्रचलीत धोरणानुसार संबधीत नगर परिषदांनी त्यांचे महसूली उत्पन्न‍ वाढवावे असे निर्देश वेळोवेळी देण्यात आलेले आहेत. सद्याच्या प्रचलीत धोरणानुसार मालमत्ता करात व गाळे भाड्यात सवलत देण्याबाबत शासनाचे धोरण नसल्याचे स्पष्ट करत तातडीने पालिकेने आकारलेला कर भरावा असे आवाहन मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी केले आहे.याबाबत माहिती देतांना मुख्याधिकारी श्रीमती डगळे म्हणाल्या की, कोरोना काळातील लोकडाउनमुळे शहरातील सर्व व्यापारी आणि जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे पालिकेने चालू वर्षाच्या मालमत्ता करात 50% टक्के सूट द्यावी यासाठी विविध व्यापारी संघटनांनी पालिका प्रशासनास निवेदने दिली होती तर भाजप व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण केले होते. यावेळी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी सदरचा प्रस्ताव विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले होते.सदरचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी २८ ऑक्टोंबर रोजी नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण बोलावली होती, त्यात हे दोन्ही प्रस्ताव सादर करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याीत आलेले आहेत. प्रस्ताव मंजूर व्हावेत यासाठी नगराध्यक्ष व काही नगरसेवकांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापपावेतो राज्यातील कोणत्याही नगरपरिषदेस अथवा नगरपंचायतीस अशी सवलत देण्यात आलेली नाही,सटाणा नगर परिषदेचे उत्पन्न ‍ वाढीसाठी शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्या्बाबत निर्देश असल्याने गाळेधारकांनी विहित नियमानुसार आजपर्यंत थकलेल्या भाडेपट्टा व नागरिकांनी नगर परिषद अधिनियमाच्या तरतुदीनुसार मालमत्ता कर भरून पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डगळे यांनी केले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMuncipal Corporationनगर पालिका