सरपंचपदी सुनीता भरसठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 00:38 IST2016-07-19T00:36:44+5:302016-07-19T00:38:21+5:30
वणी ग्रामपालिका : उपसरपंचपदी विलास कड यांची वर्णी

सरपंचपदी सुनीता भरसठ
वणी : दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठ्या वणी ग्रामपालिकेच्या सरपंचपदी सुनीता भरसठ व उपसरपंचपदी विलासराव कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपालिकेची निवडणूक या आधीच पार पडली आहे.
भगवती पॅनलने १७ पैकी १२ जागांवर मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ग्रामपालिकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम. बी. देवरे, मंडल अधिकारी के. बी. केसरे व एस. वाय. पगारे, ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव याच्या उपस्थितीत बैठक झाली.
सरपंचपदासाठी सुनीता भरसठ व उपसरपंचपदासाठी विलास कड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. भरसठ यांनी यापूर्वी
दिंडोरी पंचायत स्ािमती सभापती
व वणी ग्रामपालिकेचे
सरपंचपदही भूषिविले आहे.
( वार्ताहर )