सरपंचपदी झोले, उपसरपंचपदी शेलार

By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-06T22:42:49+5:302014-08-07T02:04:29+5:30

सरपंचपदी झोले, उपसरपंचपदी शेलार

Sarpanch padhi | सरपंचपदी झोले, उपसरपंचपदी शेलार

सरपंचपदी झोले, उपसरपंचपदी शेलार

 

घोटी : घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीना जयप्रकाश झोले यांची तर उपसरपंचपदी रामदास शेलार यांची बिनविरोध निवड झाली. घोटी ग्रामपंचायतीच्या राजकीय इतिहासात बिनविरोध निवडीची ही पहिलीच वेळ आहे.
घोटी ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात नंदकुमार वालझाडे, मोहन भगत, बाळासाहेब सुराणा, जगन भगत, अण्णासाहेब डोंगरे, सुनील जाधव, कैलास कस्तुरे, दिलीप भन्साळी, संतोष दगडे, रामदास शेलार, यांच्या पॅनलने सोळा, तर एक जागा अपक्षाला मिळाली होती.
आज सरपंच व उपसरपंच निवडीसाठी पीठासन अधिकारी धनंजय बागुल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी हरि सूर्यवंशी, राजेंद्र दिवटे यांनी सहकार्य केले. सरपंचपदासाठी मीना झोले उपसरपंचपदासाठी रामदास शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, शरद हांडे, अशोक मुनोत, रवींद्र गोठी, पारस राकेचा, राजेंद्र माळचे, जगन भगत, संजय आरोटे, मोहन भगत, अशोक मुनोत, संतोष रूपवते मदन रूपवते, मीरा काळे, राजेंद्र माळचे, मीरा आंबेकर, जयप्रकाश झोले, इंदुमती अस्वले, लता जाधव, धोंडीराम कौले, कोमल गोनके, मंगल आरोटे, प्रा.मनोहर घोडे, संतोष दगडे, कोंड्याबाई बोटे, समाधान जाधव, आशा जाधव उपस्थित होते. नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.
(वार्ताहर)

Web Title: Sarpanch padhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.