दीड वर्षानंतर मिळाले हातरूंडीला सरपंच
By Admin | Updated: January 3, 2016 22:44 IST2016-01-03T22:41:10+5:302016-01-03T22:44:47+5:30
दीड वर्षानंतर मिळाले हातरूंडीला सरपंच

दीड वर्षानंतर मिळाले हातरूंडीला सरपंच
पेठ : तालुक्यातील हातरूंडी येथील ग्रामपंचायतीत दीड वर्षानंतर सरपंचपदी शांताबाई गोविंद महाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
सामाजिक कार्यकर्ते अंबादास सातपुते यांनी याबाबत विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने निवडणूक जाहीर केली़ निवडणूक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी राठोड यांनी
काम पाहिले. यावेळी तलाठी गव्हाळे, ग्रामसेवक भडांगे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते़ रानविहीर सरपंचपदी पुष्पाभुसारे
रानविहीरच्या सरपंचपदी पुष्पा कृष्णा भुसयारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंचपदासाठी गीता भास्कर भुसारे यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना ऐनवेळी पुष्पा भुसारे यांनी अर्ज दाखल केल्याने अखेरच्याक्षणी पुष्पा भुसारे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली़ मंडल अधिकारी सी़ एम़ जाधव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले़ यावेळी ग्रामसेवक बोसारे उपस्थित होते़ (वार्ताहर)