अडीच महिन्यांनी मिळाले नगरसूलला सरपंच

By Admin | Updated: September 30, 2014 22:42 IST2014-09-30T22:41:46+5:302014-09-30T22:42:03+5:30

अडीच महिन्यांनी मिळाले नगरसूलला सरपंच

Sarpanch got the city council two and a half months later | अडीच महिन्यांनी मिळाले नगरसूलला सरपंच

अडीच महिन्यांनी मिळाले नगरसूलला सरपंच

नगरसूल : येथील ग्रामपंचायतीला तब्बल अडीच महिन्यांनंतर अखेर सरपंच लाभले असून, आज झालेल्या सरपंचपद निवडणुकीत अशोक विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
नगरसूल येथील ग्रामपंचायत सरपंच सुभाष निकम यांच्यावर विविध कारणे दाखवा करत १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ५ जुलै रोजी अविश्वास प्रस्ताव पारीत केला होता. मात्र निकम यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे अविश्वास निकालाविरोधात अपिल दाखल केल्याने सरपंचपद निवड लांबणीवर पडली होती.
तालुक्यातील सर्वांत मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायतीस सरपंचपद रिक्त राहिल्याने अनेक विकासकामे व प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. अखेर अडीच महिन्यांनंतर सरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा होताच, सोमवारी (दि.२९) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात वॉर्ड क्र.१ मधून निवडून आलेले सत्ताधारी गटाचे अशोक विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणूक सभेस ज्येष्ठ सदस्य प्रा. प्रमोद पाटील, उपसरपंच अनिता पैठणकर, सदस्य गोविंद माळी, वसंत माळी, मीना पाटील, वंदना कोतकर, अर्चना गायकवाड, सुरेखा पवार, अशोक वानखेडे, नितीन जाधव, सुनील पैठणकर, उज्ज्वला पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, विठ्ठल बोरसे आदि उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्कल ए. आर. पगारे होते, तर तलाठी एम. एम. पिंपळसे, ग्रामविकास अधिकारी एम. डी. भाबड यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर नूतन सरपंच अशोक पाटील यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर कार्यालयाबाहेर उपस्थितांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. यावेळी राजेंद्र पैठणकर, बळवंत थोरात, किरण तांगडे, धर्मा बोडखे, बाजीराव कोतकर, सीताराम पैठणकर, बळवंत थोरात, राजेंद्र पगारे, गंगाधर मोकळ, बाळूमामा भालेराव, एकनाथ पठारे, पप्पू गंडाळ, बाळू जाधव, सूरज राजपूत आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुभाष निकम, हर्षल बहादुरे हे दोन सदस्य अनुपस्थित राहिले. (वार्ताहर)

Web Title: Sarpanch got the city council two and a half months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.