हनुमंतपाड्यावर सरपंच अनिता यांचे उत्तम ‘वीज व्यवस्थापन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:21 PM2019-02-28T17:21:10+5:302019-02-28T17:25:09+5:30

वीजेची बचत काळाची गरज ओळखून भुसारे यांनी गावाचा विकास साधताना वीज व्यवस्थापनावर भर दिला. सुर्यप्रकाशाचा अचूक वापर करत त्यांनी पाड्यावर १९ सौर पथदीप साकारले.

Sarpanch Anita's excellent 'power management' at Hanumantapada | हनुमंतपाड्यावर सरपंच अनिता यांचे उत्तम ‘वीज व्यवस्थापन’

हनुमंतपाड्यावर सरपंच अनिता यांचे उत्तम ‘वीज व्यवस्थापन’

Next
ठळक मुद्देपाड्यावर १९ सौर पथदीप साकारले१० टक्के ग्रामहिस्सा भरून जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सौर प्रकल्प उभारला

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी गावाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तरूण तडफदार हनुमंतपाड्यावर सरपंच अनिता रमेश भुसारे यांनी उत्तम वीज व्यवस्थापन करत पाड्यावरील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांना ‘वीज व्यवस्थापन’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
पेठ तालुका हा जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील आदिवासी गाव-पाड्यांवर वीज, पाण्याची टंचाई जाणवते. वीजेची बचत काळाची गरज ओळखून भुसारे यांनी गावाचा विकास साधताना वीज व्यवस्थापनावर भर दिला. सुर्यप्रकाशाचा अचूक वापर करत त्यांनी पाड्यावर १९ सौर पथदीप साकारले. ग्रामपंचाय कार्यालयावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविले. शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाला वीजपुरवठा केला. १० टक्के ग्रामहिस्सा भरून जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सौर प्रकल्प उभारला यामुळे वीजदेयकात बचत झाली. विविध संस्थांकडून ग्रामपंचायतींना वीजपुरवठा केला गेला. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Web Title: Sarpanch Anita's excellent 'power management' at Hanumantapada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.