महिला बालकल्याण सभापतिपदी सरोज अहिरे

By Admin | Updated: May 12, 2017 17:57 IST2017-05-12T17:57:53+5:302017-05-12T17:57:53+5:30

निवड निश्चित : उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांचा अर्ज

Saroj Ahire as Women's Child Welfare Chairman | महिला बालकल्याण सभापतिपदी सरोज अहिरे

महिला बालकल्याण सभापतिपदी सरोज अहिरे

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी भाजपाकडून सरोज अहिरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी कावेरी घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेकडून सभापतिपदासाठी नयना गांगुर्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, समितीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतिपदी सरोज अहिरे यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच बाकी आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी सोमवारी (दि. १५) दुपारी ४ वाजता निवडणूक घेण्यात येणार आहे.

Web Title: Saroj Ahire as Women's Child Welfare Chairman