सिन्नर : शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार नितीन गवळी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.राष्टÑवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, राष्टÑवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, डॉ. व्ही. एम.अत्रे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा नेला. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासह ढासलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. राज्यात शेतकरी, अंगणवाडी सेविका, एस. टी. कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर जात असल्याने शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तहसीलदार नितीन गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी डी.डी. गोर्डे, माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, मेघा दराडे, आफरीन गुलाब सय्यद, नीलिमा थोरात, सरला गायकवाड, दीपक लहामगे, डॉ. संदीप शिंदे, प्रशांत खत्री, संदीप लोखंडे, सूरज जाधव, नंदू देशमुख, संदीप जाधव, मनोज जाधव, संजय गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.
राष्टÑवादीचा हल्लाबोल मोर्चा सिन्नर : निवेदनाद्वारे नोंदविला शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:12 IST
शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी व सर्वच आघाड्यांवर शासन अपयशी ठरल्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिन्नर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.
राष्टÑवादीचा हल्लाबोल मोर्चा सिन्नर : निवेदनाद्वारे नोंदविला शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध
ठळक मुद्देतहसीलदार नितीन गवळी यांना मागण्यांचे निवेदन शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणीशासन सर्वच आघाड्यांवर अपयशी