सराईत घरफोड्यास पंचवटीत अटक
By Admin | Updated: November 21, 2015 00:01 IST2015-11-20T23:59:53+5:302015-11-21T00:01:36+5:30
सराईत घरफोड्यास पंचवटीत अटक

सराईत घरफोड्यास पंचवटीत अटक
पंचवटी : परिसरात दिवसा व रात्रीच्या सुमारास घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल घरफोड्यास पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़
या संशयित घरफोड्याचे नाव बाळू सखाराम प्रधान (रा़इरिगेशन कॉलनी, मखमलाबाद) असे असून त्याने हिरावाडी, मखमलाबाद, हनुमानवाडी, मेरी या परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे़ तसेच त्याच्याकडून घरफोडीतील एक लाख चाळीस हजार रुपयांचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहे़ ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे, पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ, संजय राऊत, भास्कर गवळी, साळुंके, नरोडे यांनी केली़
संशयित प्रधान याने शहरात आणखीन काही ठिकाणी घरफोड्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़ (वार्ताहर)