सराफांचे आंदोलन सुरूच राहणार

By Admin | Updated: March 21, 2016 00:17 IST2016-03-20T23:45:32+5:302016-03-21T00:17:55+5:30

संप कायम : नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा बंद

Sarafa movement will continue | सराफांचे आंदोलन सुरूच राहणार

सराफांचे आंदोलन सुरूच राहणार

 नाशिक : केंद्र सरकारने लादलेल्या उत्पादन कराच्या निर्णयाविरोधात पुकारलेला संप सराफ व्यावसायिकांनी रविवारी (दि.२०) मागे घेतल्याने सराफ बाजाराला प्राप्त झालेली झळाळी तात्पुरतीच ठरली. दिवसभराच्या व्यवहारानंतर संध्याकाळी सराफ असोसिएशनने संप सुरूच ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेला बंद सुरूच राहणार आहे.
सराफ व्यावसायिकांच्या १९ दिवसांच्या आंदोलनानंतरही उत्पादन कराच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही. परिणामी सराफ व्यावसायिकांनी रविवारी सकाळी दुकाने उघडली. मात्र राज्यभरातील सराफ व्यावसायिक बंदच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाशिक सराफ असोसिएशननेदेखील सोमवार, दि. २१ पासून बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी काही काळ दुकाने उघडल्याने गैरसोय झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु सराफ व्यावसायिकांनी पुन्हा बंद जाहीर केल्याने ग्राहकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Sarafa movement will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.