सराफ बाजार पाण्याखाली !

By Admin | Updated: June 15, 2017 01:06 IST2017-06-15T01:06:09+5:302017-06-15T01:06:25+5:30

दुचाकी गेल्या वाहून; अन्य वस्तूंचे नुकसान

Saraf market is under water! | सराफ बाजार पाण्याखाली !

सराफ बाजार पाण्याखाली !

नाशिक : एरव्ही गोदावरी नदीला पूर आल्यानंतर परिसरात आणि विशेषत: सराफ बाजार, कापड बाजारात पाणी शिरते, परंतु अवघ्या दीड तासात थैमान घालणाऱ्या पावसाने विक्रेत्यांमध्ये हाहाकार माजवला. दुकानातील वस्तू वाचवाव्या की जीव सांभाळावा अशा प्रकारची भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक दुचाकी वाहून गेल्याची काहींनी तक्रार केली आहे. याप्रकारामुळे व्यावसायिक भयभीत झाले आहेत.
२००८ नंतर गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीने गोदावरी नदीला पूर आला होता. त्यावेळी सराफ बाजारात पाणी शिरले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

Web Title: Saraf market is under water!