नाशिकचे सप्तशृंगी मंदिर संरक्षक जाळ्यांमुळे बचावले : दरड कोसळली
By Admin | Updated: June 12, 2017 20:13 IST2017-06-12T20:13:08+5:302017-06-12T20:13:08+5:30
साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणीमधील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आज पावणेपाच वाजेच्या सुुमारास डोंगरावरील दोन मोठे दगड कोसळले

नाशिकचे सप्तशृंगी मंदिर संरक्षक जाळ्यांमुळे बचावले : दरड कोसळली
नाशिक : साडेतीन शक्तिपीठापैकी एक असलेले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणीमधील श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आज पावणेपाच वाजेच्या सुुमारास डोंगरावरील दोन मोठे दगड कोसळले; मात्र सुदैवाने मंदिरावरील बाजूने डोंगराला लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीमध्ये हे दगड अडकल्याने मंदीरासह भाविकही सुरक्षित राहिले.
मंदिराच्या व भाविकांच्या सुरक्षेसाठी ज्या संरक्षक जाळ्या डोंगराच्या कपारीमध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दोन मोठे दगड संध्याकाळच्या सुमारास डोंगरमाथ्यावरून कोसळले. सुदैवाने जाळ्यांमध्ये हे दगड अडकले व जाळ्यादेखील दगडांच्या वजनाने तुटल्या नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा दगड मंदिरावर कोसळण्याचा धोका होता. अंदाजे एक दगड पाचशे ते सहाशे किलो वजनाचा आहे.
सप्तशृंगगडावर दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे दरड कोसळली. परंतु संरक्षक झाळी असल्यामुळे मंदिरासह भाविक सुरक्षित राहिले. ज्यावेळी दरड कोसळली तेव्हा मंदिंरात भाविकांची संख्या कमी होती असे व्यवस्थापकीय सुत्रांनी सांगितले. दरड कोसळल्याने मोठा आवाज झाला व एकच गोंधळ उडून धावपळ झाली. भाविकांसह परिसरातील विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली. सर्वांनी धाव घेत मंदिराच्या बाहेर येऊन डोंगरावर नजर टाकली असता जाळ्यांमध्ये दोन दगड अडक ल्याचे दिसले आणि उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.