शनिवारपासून होणार सप्तशृंगीचे दर्शन
By Admin | Updated: December 24, 2015 23:44 IST2015-12-24T23:42:27+5:302015-12-24T23:44:38+5:30
शनिवारपासून होणार सप्तशृंगीचे दर्शन

शनिवारपासून होणार सप्तशृंगीचे दर्शन
कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगीदेवीचे मंदिर येत्या शनिवारपासून (दि. २६) खुले होणार असून, भक्तांना देवीचे दर्शन घेता येणार असल्याचे सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी कळविले आहे.
सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिराच्या कळसावरील भागात सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली संरक्षक जाळी बसविण्याच्या कामामुळे दि. २६ नोव्हेंबरपासून महिनाभरासाठी मंदिरात दर्शन बंद करण्यात आले होते.
पहिल्या पायरीजवळ श्री
भगवतीच्या प्रतीकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यामुळे भाविकांना पर्यायी दर्शनातच समाधान मानावे लागत होेते.
मात्र आता संरक्षक जाळी बसविण्याचे काम पूर्ण होत
आल्याने येत्या शनिवारपासून (दि.२६) दैनंदिन नियोजनानुसार श्री सप्तशृंगदेवीचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. (वार्ताहर)