शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सप्तपदीचा विधी अन‌् चोरट्याने साधला ‘मुहुर्त’; नववधुचे ११ लाखांचे दागिने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 19:48 IST

विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता पाय घेतला.

ठळक मुद्देएक लाखाच्या रोकडचा समावेश हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती कळविलीसीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील राजीवनगर शिवारातील एका हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडत असतान सप्तपदीच्या विधीदरम्यान, मंचावरुन नववधुचे दागिने आणि रोकड असलेली ह्यलेडीज हॅन्ड बॅगह्ण एका अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक लाखाच्या रोकडसह नववधुच्या सुमारे दहा लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.८) रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी सुरेश मदनलाल बजाज (५५,रा.शहापुर) यांच्या कन्येचा विवाह हॉटेलमध्ये पार पडत होता. मंचावर सप्तपदीचा विधी सुरु असताना बजाज हे त्यांच्या पत्नी सरोज यांच्यासमवेत विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता पाय घेतला.दरम्यान, विवाहविधी सुरु असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास रामचंद्र नारायण बेलवले यांना एक मुलगा लेडीज बॅग घेऊन जात असल्याचे नजरेस पडला. त्यांनी सभागृहात मंचाजवळ येत बजाज आणि लोकांना विचारले की 'कोणी मुलगा बॅग घेऊन जाताना कोणी बघितला का' त्यावेळी बजाज यांनी पाठीमागे ठेवलेली लेडीज बॅग त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. सर्वांनी त्वरित विवाह सभागृहातून बाहेर धाव घेत पाहणी केली असता चोरटा कोठेही आढळून आला नाही, यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ पोलिसांना माहिती कळविली. याप्रकरणी बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीGoldसोनंmarriageलग्न