चांदशीच्या सरपंचपदी कचरे बिनविरोध
By Admin | Updated: May 31, 2014 02:04 IST2014-05-31T00:14:48+5:302014-05-31T02:04:11+5:30
नाशिक : चांदशीच्या सरपंचपदी युवराज कचरे, तर उपसरपंचपदी गोदावरी गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे़

चांदशीच्या सरपंचपदी कचरे बिनविरोध
नाशिक : चांदशीच्या सरपंचपदी युवराज कचरे, तर उपसरपंचपदी गोदावरी गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे़
चांदशी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली़ महिनाभरापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक झाली होती, तर शुक्रवारी (दि़ २३) सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली़ यावेळी सर्व सदस्यांनी एकमताने सरपंचपदी कचरे, तर उपसरपंचपदी गायकर यांची निवड केली़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस़ आऱ पवार यांनी काम पाहिले़ बिनविरोध निवडीसाठी पंचायत समिती सदस्य धनाजी पाटील यांनी विशेष प्रयत्न के ले़