महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली
By Admin | Updated: July 21, 2016 22:55 IST2016-07-21T22:54:08+5:302016-07-21T22:55:21+5:30
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली
नाशिकरोड : जेलरोड देशमुख भवन येथून रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गठण दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी ओढून चोरून नेले. जेलरोड गोदावरी सोसायटी क्रमांक- २ मध्ये राहणाऱ्या कांता सुभाषचंद्र नावंदर (५५) या बुधवारी सायंकाळी श्री दुर्गा देवी मंदिर येथून रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील साडेपाच तोळे वजनाचे १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गठण बळजबरीने ओढून नेले. (प्रतिनिधी)