शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी जाणार ’शिवशाही’ थाटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:43 IST

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे ...

ठळक मुद्देपायी दिंडीला परवानगी नाही; बसमधील प्रवाशी संख्या जिल्हाधिकारी ठरवणार; परंपरा खंडीत होऊ नये म्हणून पादुका गर्भगृहातून पालखीत

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ महाराज पायी दिंडी पालखी सोहळा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा ज्येष्ठ कृ.१ रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे रवाना होत असतो. मात्र, यंदा कोरोना महामारीचे संकट असल्याने दिंडी सोहळा स्थागित केला आहे. त्याऐवजी आषाढ शु. दशमीला शिवशाही बसमधून निवृत्तिनाथांची पालखी ३0 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.बसमध्ये पन्नास प्रवासी बसण्याची क्षमता असली तरी पालखीसोबत कोण आणि किती भाविक जाणार याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. त्यामुळे नाथांच्या भाविकांचे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. विश्वस्त, टाळकरी, विणेकरी तसेच मानकरी पालखीसह पंढरपूरकडे रवाना होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.दशमीला पंढरपूर येथे आगमन झाल्यानंतर आषाढ दशमी (दि.३0) मुक्काम व दुस-या दिवशी आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्राा दर्शनादी सोपस्कार पार पडल्यानंतर दुस -या दिवशी उपवास सोडल्यानंतर पालखी पुन्हा बसनेच त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या प्रवासास प्रयाण करणार आहे.परंपरेनुसार निवृत्त्तिनाथांच्या पादुका गर्भगृहातून बाहेर काढण्यात येतील. पूजाविधी केला जाईल. यानंतर संजीवन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर आषाढ शु.दशमी पर्यंत पादुका सभा मंडपात ठेवण्यात येतील. मधल्या काळात दररोज विधीवत पूजाअर्चा होत जाईल.असा यंदाच्या पंढरपूर वारीचा कार्यक्र म आहे. राज्य शासनाच्या आदेशाचा आदर करु न विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पंडितराव कोल्हे रामभाऊ मुळाणे, पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे, जयंत गोसावी, योगेश गोसावी, ललिता शिंदे, जिजाबाई लांडे, मधुकर लांडे, संदीप शिंदे यांच्या संमतीनेच शिवशाही बसनेच पालखी नेण्याचे निश्चित झाले. दरम्यान पालखी समवेत समाधी संस्थानचे मानकरी मनोहर महाराज, बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, जयंत महाराज, गोसावी देहुकरमाऊली आदींसह विश्वस्त मंडळातील सदस्य, टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक आदींचा समावेश असेल. पण किती लोक आणि कोण याचा निर्णय जिल्हाधिकारी ठरवतील.पालखी शिवशाही बसने थेट पंढरपूरला जाणार असल्याने व पादुका त्र्यंबकेश्वर येथेच असणार असल्याने निवृत्तिनाथ संजीवन समाधी सोहळा मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत गर्दी न करता त्र्यंबकेश्वर येथेच संपन्न होईल. संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरलाच पार पडणार असल्याची ही तिसरी वेळ आहे. याप्रसंगी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.- पवनकुमार भुतडा,श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरपालखीची परंपरा ठेवली कायम!बसमध्ये ५0 प्रवासी असतात. पण त्र्यंबकेश्वरहून किती लोक पाठवण्यास जिल्हाधिकारी परवानगी देतील ते सांगता येत नाही. बसमध्ये फिजिकल डिस्टिन्संगचा वापर करण्यात येईल. तसेच बस समवेत पोलीस बंदोबस्त असावा अशीही मागणी करणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी सांगितले. दरम्यान, पालखीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून, निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुका गर्भगृहातून काढून पालखीत ठेवण्यात आल्या. यावेळी ‘बोला पुंदलिक वरदा हरी विठ्ठल’चा जयघोष करा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. आता या ठिकाणी दैनंदिन पूजा-अर्चा-अभंग, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे