येवल्यात संत रोहिदास जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST2021-03-04T04:24:51+5:302021-03-04T04:24:51+5:30

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शासकीय नियमांचे पालन करत संत रोहिदास महाराज यांच्या ...

Sant Rohidas Jayanti celebration in Yeola | येवल्यात संत रोहिदास जयंती साजरी

येवल्यात संत रोहिदास जयंती साजरी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शासकीय नियमांचे पालन करत संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. गोशाळेतील जनावरांना या निमित्ताने चारावाटप करण्यात आले. कार्यक्रमास आकाश मथुरे, संदीप बडोदे, प्रमोद बडोदे, गणेश सिमरे, कृष्णा बडोदे, विजय ढोलपुरे, नितीन पिंपळे, सागर पिंपळे, दिनेश पिंपळे, दर्शन मोहारे, रोशन पवार, रतन गुजरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

दरम्यान, शहर चर्मकार समाजाच्या वतीनेही श्री संत रोहिदास जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन आदर्श शिक्षक नानासाहेब कु-हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महेश पगारे, गोकुळ वाघ, भगवान बडोदे, योगेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

फोटो- ०१ येवला रोहिदास

===Photopath===

010321\491201nsk_46_01032021_13.jpg

===Caption===

फोटो- ०१ येवला रोहिदास 

Web Title: Sant Rohidas Jayanti celebration in Yeola