चांदवड येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी
By Admin | Updated: July 26, 2014 00:50 IST2014-07-25T23:39:36+5:302014-07-26T00:50:32+5:30
चांदवड येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी

चांदवड येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी
चांदवड : क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या वतीने सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी पगडी गणेश मंदिरापासून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक राघोबा महाराज समाधीस्थळी विसर्जित करण्यात आली. यावेळी आरती व महाप्रसाद कार्यक्रम झाला. अभिजित कापडणी, राधेश्याम चव्हाण यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. संजय कोकणे, रवींद्र सोनवणे, डॉ. प्रसाद कापडणी, डॉ. अमोल सोनवणे, दीपक अहेर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)