महिलांसाठी संस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:14 IST2017-08-18T23:38:38+5:302017-08-19T00:14:46+5:30

निष्काम कर्मयोगी जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगद्माउली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथील आश्रमात ध्वजारोहण संपन्न झाले.

Sanskar Camp for Women | महिलांसाठी संस्कार शिबिर

महिलांसाठी संस्कार शिबिर

ओझर टाऊनशिप : निष्काम कर्मयोगी जनार्दनस्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगद्माउली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे ओझर येथील आश्रमात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी यज्ञ पूर्णाहुती, श्री बाबाजी कुटिया वास्तुप्रवेश, लक्षवेधी पालखी मिरवणूक, प्रवचन, सत्संग, महाआरती आदी कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात मुख्य कार्यक्रमाचे ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी बाबाजी कुटिया प्रवेश सोहळा, यज्ञाची पूर्णाहुती, संतपूजन, अतिथी पूजन, कीर्तिध्वज पूजन, बाबाजी पाद्यपूजन आदी कार्यक्र म संपन्न झाले. वेदशास्त्रसंपन्न विलासगुरु कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
या सोहळ्यानिमित्त अष्टविनायक, अष्टलक्ष्मी, नवग्रह, अष्टमूर्ती शंकर पूजा आदी धार्मिक कार्यक्रम होत आहे. तसेच महिला संस्कार शिबिर, जपानुष्ठान, नामजप, रोज पहाटे ५ वाजता नित्यपूजा विधी, सत्संग, प्रवचन, आश्रमीय संतांचे मार्गदर्शन आदी कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Sanskar Camp for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.