उंदीरवाडी उपसरपंचपदी संजय देशमुख
By Admin | Updated: October 9, 2016 00:16 IST2016-10-09T00:16:19+5:302016-10-09T00:16:49+5:30
उंदीरवाडी उपसरपंचपदी संजय देशमुख

उंदीरवाडी उपसरपंचपदी संजय देशमुख
येवला : उंदीरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय हिंमतराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच संगीता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडप्रक्रि येत संजय हिंमतराव देशमुख यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच संगीता सोनवणे यानी संजय देशमुख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
सदर निवडीप्रसंगी सचिन कळमकर, दीपक देशमुख, बाळासाहेब सोनवणे, विनोद जेजूरकर, अमोल क्षीरसागर, दत्तात्रय सोनवणे, साखरचंद सोनवणे, मारुती जेजूरकर, अचित कळमकर, बापू अहेर, राणी
गायकवाड, ज्योती जाधव, मनीषा झाल्टे, मोनिका चोधरी, यमुनाबाई क्षीरसागर, तुकाराम गोराणे, बापू जाधव, रवींद्र कदम, शुक्लेश्वर पवार, सोमनाथ गायकवाड, तुळशीराम देशमुख, प्रभाकर चव्हाण, तुळशीराम राजुळे, नारायण राजुळे, शिवाजी भंडारे यांच्यासह ग्रामस्थ, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.