मनमाड : येथील गुरु द्वारा गुपतसर समतिीच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटायझर फवारणी मोहिमेचा शुभारंभ गुरु द्वारा प्रबंधक बाबा रणजीसिगजी व मुख्याधिकारी झॅ दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आला.ज्या वेळेस शहरावर काही आपत्ती येते त्यावेळी गुरु द्वारा कडून मदतीचे योगदान मिळत असते. आजसुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटाईझरच्या 10 हजार लिटरच्या टँकरद्वारे शहरात फवारणी करून कोरोना मुक्त शहर करण्याचा निश्चय गुरु द्वारा समतिीने घेतला आहे. मोठ्या टँकर द्वारे शहराच्या विविध भागात फवारणी करण्यात येत आहे. गुरु द्वारा प्रबंधक बाबारणजित सिंग, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, तालुका संघटक मंगलिसंग कटारीया यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी माजी नगरध्यक्ष प्रविण नाईक, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, राजेद्र भाबड, कैलास आहीरे, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, मयुर बोरसे, दिलीप नरवडे, राजेंद्र जाधव, नाझीम शेख, दिनकर धिवर, फिरोज शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरु द्वारा गुपतसर समतिीचा पुढाकार शहरात सॅनिटाईझर फवारणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:47 IST
मनमाड : येथील गुरु द्वारा गुपतसर समतिीच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटायझर फवारणी मोहिमेचा शुभारंभ गुरु द्वारा प्रबंधक बाबा रणजीसिगजी व मुख्याधिकारी झॅ दिलीप मेनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
गुरु द्वारा गुपतसर समतिीचा पुढाकार शहरात सॅनिटाईझर फवारणी मोहीम
ठळक मुद्दे शहरात फवारणी करून कोरोना मुक्त शहर करण्याचा निश्चय गुरु द्वारा समतिीने घेतला आहे.