शिवविचार प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:24+5:302021-05-10T04:14:24+5:30
फोटो- ०८ चांदवड शिवविचार कॅप्शन---- चांदवड येथील पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना शिवविचार प्रतिष्ठानच्या वतीने हॅन्ड सॅनिटायझर वाटप करताना राहुड येथील ...

शिवविचार प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना सॅनिटायझर
फोटो- ०८ चांदवड शिवविचार
कॅप्शन----
चांदवड येथील पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना शिवविचार प्रतिष्ठानच्या वतीने हॅन्ड सॅनिटायझर वाटप करताना राहुड येथील दत्तनगर ग्रुपचे नामदेव पवार, निखिल पवार, सागर सोमवंशी, समाधान सोमवंशी.
मोरीत सिमेंट पडून नुकसानीची भीती
काजीसांगवी: चांदवड तालुक्यातील काजीसांगवी ते पाटे या रस्त्याचे काही दिवसांपासून डांबरीकरण सुरू होते. आता काम पूर्ण झाले आहे, तर पाटे व काजीसांगवी या दोन गावांमधील जोडणाऱ्या एका लहान ओहळावर मोरीचे काम केल्यानंतर, त्याच्या पाइपामध्ये सिंमेट भरलेले असून, ते तसेच पडून राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या पाइप व मोरीतून पाणी पुढे कसे जाईल, असा प्रश्न निर्माण झाला असून, परिसरातील शेतकऱ्यांचे शेतात हे पाणी घुसून नुकसान होण्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. संबंधितांनी या पाइपचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
फोटो - ०८ काजीसांगवी पाइप
कॅप्शन---
काजीसांगवी-पाटे येथील रस्त्यावर मोरीच्या कामातील पाइपमध्ये अडकलेले सिमेंट.
शेतीतील रस्त्याच्या वादावरून मारामारी
चांदवड : तालुक्यातील सुतारखेडे येथे शेत गट नंबर ६२ शिवारातील सामूहिक रस्त्यावरून नीलेश कैलास निकम (१६) रा.सुतारखेडे हा जात असताना या रस्त्याने जा-ये करावयाची नाही, असे सांगून, गणेश प्रशांत निकम, सोनू प्रशांत निकम, प्रशांत शिवाजी निकम व शिवाजी यशवंत निकम (सर्व रा. सुतारखेडे) यांनी नीलेश यास मारहाण केली, तसेच त्याचे वडील कैलास शांताराम निकम, काका शंकर निकम, रामनाथ शंकर निकम यांनाही या चौघांनी मारहाण केली. मारहाणीत नीलेश निकम हा जबर जखमी झाला. त्यास तातडीने उसवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करून अधिक उपचारासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांदवड पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक मोरे हे तपास करीत आहेत.
चांदवडला १०८ नवीन बाधित रुग्ण
चांदवड : येथे शुक्रवारी (दि.७) १०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील आडगाव, आसरखेडे, भयाळे, भाटगाव, भुत्याणो, भोयेगाव, धोंडबा, धोंडगव्हाण, देणोवाडी, दरेगाव, दहेगाव, दुगाव, गणूर जोपूळ, काजीसांगवी, कानमंडाळे, खडकओझर, कुंडाणे, मालसाणे परसूल, पाथरशेंबे, पुरी, शेलू, सोग्रस, उसवाड, वडाळीभोई, वडनेरभैरव या ठिकाणी सदर रुग्ण आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
===Photopath===
080521\511008nsk_39_08052021_13.jpg~080521\511008nsk_40_08052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०८ चांदवड शिवविचार ~फोटो - ०८ काजीसांगवी पाइप