वृद्धाश्रमात सॅनिटायझर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST2021-06-18T04:10:42+5:302021-06-18T04:10:42+5:30

वाहतूक कोंडीमुळे निघाले बॅरिकेडस् नाशिक: द्वारका ट्रॅक्टर हाऊसजवळील उड्डाणपुलाखालील मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला असल्याने ...

Sanitizer distribution in old age home | वृद्धाश्रमात सॅनिटायझर वाटप

वृद्धाश्रमात सॅनिटायझर वाटप

वाहतूक कोंडीमुळे निघाले बॅरिकेडस् नाशिक: द्वारका ट्रॅक्टर हाऊसजवळील उड्डाणपुलाखालील मार्ग गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. गुरुवारी द्वारका चौकात वाहतूक कोंडी झाल्यामुळे येथील बॅरिकेडस‌् तात्पुरते काढण्यात आले असून काही वेळापुरते का होईना नागरिकांना दिलासा मिळाला. येथील मार्ग खुला करण्याची मागणी होत आहे.

ट्रेकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल नाशिक: सुटीच्या दिवशी त्र्यंबकेश्वरला अनेक पर्यटक हे ट्रेकिंगसाठी येत असतात. अशाप्रकारे विनापरवाना ट्रेकिंग करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात ५९ पर्यटकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही मेाहीद पुढेही सुरू राहाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सातपूरच्या शाळेत पटनोंदणी अभियान

नाशिक: सातपूर कॉलनी येथील जिजामाता शाळा क्रमांक २८ येथे पटनोंदणी अभियान सुरू करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असून पटनोंदणी करण्याचे आदेश शासनाने काढलेले आहेत. त्यानुसार शाळास्तरावर मुलांची पटनोंदणी केली जात आहे. यासाठी शिक्षक-पालक विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Sanitizer distribution in old age home