शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

गोदा प्रदूषण टाळण्यासाठी ४० गावांचा स्वच्छता आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:12 AM

गोदावरी प्रदूषण नियंत्रण उच्चाधिकार समितीची बैठक गुरुवारी (दि. ७) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे घेण्यात आली. ...

गोदावरी प्रदूषण नियंत्रण उच्चाधिकार समितीची बैठक गुरुवारी (दि. ७) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे घेण्यात आली. यावेळी गमे यांनी आदेश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील प्रदूषण समितीतील ४० गावांचा समावेश वसुंधरा अभियानांतर्गत करावा तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर या गावांतील सांडपाणी नियोजन करण्यासाठी करण्याचे आदेश ही गमे यांनी केले, तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ४० गावांमधील स्वच्छता कामांचा कृती आराखडा तयार करण्यात येत असून, तो महिना अखेरीस पूर्ण होईल, असे सांगितले.

बैठकीस विभागीय उपआयुक्त दत्तात्रेय बोरूडे, नगररचना विभागाच्या सहायक संचालक प्रतिभा भदाणे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल, याचिकाकर्ते राजेश पंडित व निशिकांत पगारे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

इन्फो...

औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निरी व महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ यांची एकत्रित बैठक महापालिकेने घ्यावी तसेच गोदावरी प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी, असे आदेश राधाकृष्ण गमे यांनी दिले. त्याचबरोबर प्रदूषण टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.