लासलगाव येथे स्वच्छता अभियान

By Admin | Updated: January 25, 2016 22:51 IST2016-01-25T22:51:52+5:302016-01-25T22:51:54+5:30

लासलगाव येथे स्वच्छता अभियान

Sanitation Campaign at Lassalgaon | लासलगाव येथे स्वच्छता अभियान

लासलगाव येथे स्वच्छता अभियान

लासलगाव : घराबरोबरच गाव स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे लासलगाव सुंदर होण्यासाठी लोकांनी घंटागाडीत कचरा टाकून सहकार्य करावे, तसेच उपाहारगृह चालकांनी कचरा संकलित करून तो घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर यांनी केले.
रविवारी सकाळी स्वच्छ आणि सुंदर लासलगाव व पिंपळगाव नजीक या दोन गावांकरिता दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतादूत व लासलगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी लासलगाव व पिंपळगाव नजीक येथे स्वच्छता अभियान राबविले. लासलगाव येथील शिवाजी चौकात सकाळी सरपंच संगीता शेजवळ, उपसरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपसरपंच जयदत्त होळकर, सुलेमान मुलाण, डॉ. विजय बागरेचा, पोलीस निरीक्षक नवले, राजेंद्र चाफेकर यांच्या भाषणानंतर लासलगाव येथील सहा प्रभागांतील दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतादूत, लासलगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ केले. गोकुळ पाटील यांनी यापूर्वी स्वच्छता अभियान राबविले होते. दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ३६३ स्वच्छतादूत, १८९ ग्रामस्थ व ३६० महाविद्यालयीन युवक- युवती या अभियानात सहभागी झाले. लासलगाव व पिंपळगाव नजीक येथील २४.५ किलोमीटर रस्त्यावर साफसफाई करण्यात आली. ८ हजार ४५० चौरस मीटर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १८ हजार ५१६ किलो कचरा जमा केला गेला. गोकुळ पाटील यांनी प्रास्ताविक केले. विकास कोल्हे यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Sanitation Campaign at Lassalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.