नागोसली ग्रामपंचायतीतर्फे सॅनिटाझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:51 IST2020-04-01T15:51:21+5:302020-04-01T15:51:45+5:30
कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यापासून बचाव व्हावा या उद्देशाने नागोसली (वैतरणानगर) ग्रामपंचायतीच्या वतीने शिदवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात येऊन सोशल डिस्टन्सिंग उपक्र म राबवण्यात आला.

नागोसली (वैतरणानगर) ग्रामपंचायतीच्या वतीने शिदवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप करताना नितीन खातळे. समवेत ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी.
वैतरणानगर : कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, यापासून बचाव व्हावा या उद्देशाने नागोसली (वैतरणानगर) ग्रामपंचायतीच्या वतीने शिदवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप करण्यात येऊन सोशल डिस्टन्सिंग उपक्र म राबवण्यात आला. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने जंतुनाशक फवारणीही करण्यात येत आहे. यावेळी चेअरमन नितीन खातळे, तुकाराम गिºहे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंता शिद, दत्तू गिºहे, ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू शिंदे, संजय ताठे आदी उपस्थित होते.