शेणितच्या उपसरपंचपदी संगिता जाधव बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:54 IST2020-09-10T23:39:08+5:302020-09-11T00:54:10+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शेणितच्या उपसरपंचपदी संगिता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शेणितच्या उपसरपंचपदी संगिता जाधव बिनविरोध
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील शेणितच्या उपसरपंचपदी संगिता जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली जाधव होत्या. शेणित येथे आवर्तन पद्धतीनुसार उपसरपंच मनिषा वारूंगसे यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर उपसरपंच पद रिक्त झाले होते. यानंतर ठरलेल्या वेळेत उपसरपंचपदाच्या निवडणूकीत उपसरपंच पदासाठी संगिता जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे रतन जाधव, अरुण जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम अधिकारी संदिप नेटके यांनी काम पाहिले. याप्रसंगी विठोबा जाधव, अशोक जाधव, रमेश जाधव, कुंडलिक तेलोरे, रामदास तेलोरे, माजी सरपंच राजू जाधव, शरद तेलोरे, रवींद्र पवार, संजय जाधव, मंदा जाधव, सरला घारे, मनीषा वारुंगसे उपस्थित होते.