पाटोळेच्या सरपंचपदी संगीता आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:25 IST2021-02-28T04:25:36+5:302021-02-28T04:25:36+5:30
माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने सात जागा मिळवून निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात ...

पाटोळेच्या सरपंचपदी संगीता आव्हाड
माजी सरपंच मेघराज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने सात जागा मिळवून निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी विशेष बैठक पार पडली. सरपंच पदासाठी संगीता आव्हाड यांच्या नावाची सूचना सुनील सांगळे यांनी मांडली, तर उपसरपंचपदासाठी जिजा खताळे यांच्या नावाची सूचना गीतांजली कराड यांनी मांडली. निर्धारित वेळेत दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी पवार यांनी केली.
फोटो - २६ मानोरी सरपंच
सिन्नर तालुक्यातील पाटोळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता आव्हाड, तर उपसरपंचपदी जिजा खताळे यांची बिनविरोध निवड झाली. त्याप्रसंगी मेघराज आव्हाड, मनोहर चकोर, गीतांजली कराड, मोहिनी खताळे, सुनील सांगळे, देवीदास कराड, मनीषा खताळे आदी.