कोटमगाव खुर्दच्या सरपंचपदी संध्या कोटमे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 18:10 IST2021-02-18T18:09:53+5:302021-02-18T18:10:35+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली.

येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संध्या कोटमे तर उपसरपंचपदी प्रवीण मोरे यांच्या निवड प्रसंगी जल्लोष करताना ग्रामस्थ.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द (देवीचे) येथील सरपंचपदी संध्या अर्जुन कोटमे यांची, तर उपसरपंचपदी प्रवीण कारभारी मोरे यांची बहुमताने निवड झाली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे युवानेते नानासाहेब लहरे व जगदंबा देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास पॅनलला सातपैकी पाच जागा, तर जगदंबा जनशक्ती पॅनलला दोन जागा मिळाल्या होत्या.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मतदानात संध्या कोटमे यांना पाच मते मिळाली. तर गीतांजली नवले यांना दोन मते मिळाली. कोटमे यांना सात पैकी पाच मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी बहुमताने निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत स्वाभिमानी विकास पॅनलचे उमेदवार प्रवीण मोरे यांना पाच, तर प्रतीक्षा लहरे यांना दोन मते मिळाल्याने मोरे यांची बहुमताने निवड झाली,
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशा कोटमे, गणेश कोटमे, मनिषा माळी, प्रतिक्षा लहरे, गीतांजली नवले उपस्थित होते. सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास करु असे सरपंच संध्या कोटमे यांनी म्हटले.