शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांच्या पथकावर घातला वाळूचा ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:42 IST

सटाणा तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्देसटाणा : मोसम नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा

सटाणा : तालुक्यात वाळूमाफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, मोसम नदीपात्रात वाळूच्या चोरट्या वाहतुकीला मज्जाव करणाऱ्या तहसीलदारांच्या पथकावर वाळूचा ट्रॅक्टर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर प्रकार गुरुवारी (दि. २२) रात्री घडला. वाळूमाफिया मात्र ट्रॅक्टर सोडून पसार झाला असून, पथकाने एका ट्रकसह दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत.तालुक्यात निर्माण झालेली अभूतपूर्व भीषण पाणीटंचाई लक्षात घेता बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी सर्वप्रथम नदी, नाल्यांमध्ये सुरू असलेला बेसुमार वाळू उपसा रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी वाळूतस्करीविरोधी पथकेदेखील निर्माण केली आहेत. ठिकठिकाणी छापे टाकून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम प्रशासनातर्फे सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास वाळूतस्करीविरोधी पथक गस्तीवर असताना जायखेडानजीक मोसम नदीपात्रात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये भरताना रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न पथकाने केला. मात्र वाळूमाफियांनी या पथकावरच वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पथकातील पुरवठा अधिकारी मेजर मोरे, मंडल अधिकारी अहिरे, तलाठी बागुल यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला. यावेळी वाळूमाफिया सागर अंबर सोनवणे व त्याचे सहा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान, याच पथकाने आरम नदीपात्रातही छापे टाकले. मोरेनगर येथे न्यू हॉलंड कंपनीचा वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर तसेच नामपूर-लखमापूर रस्त्यावर नाशिककडे वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक सापळा रचून पकडण्यात आला.वाळूतस्करीविरोधी पथकावर ट्रॅक्टर घालणाºया वाळूमाफियांविरु द्ध अद्याप पोलिसांकडे तक्र ार न केल्याने उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र या पथकाने दंडात्मक कारवाई केली असून, सात लाख वीस हजार रु पयांचा दंड तहसीलदार प्रमोद हिले यांनी ठोठावला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsandवाळू