वाळू ठिय्यांचा दुसऱ्यांदा लिलाव

By Admin | Updated: November 9, 2016 00:46 IST2016-11-09T00:27:00+5:302016-11-09T00:46:27+5:30

वाळू ठिय्यांचा दुसऱ्यांदा लिलाव

Sand stitches for a second time | वाळू ठिय्यांचा दुसऱ्यांदा लिलाव

वाळू ठिय्यांचा दुसऱ्यांदा लिलाव

नाशिक : जाचक अटी व कडक नियमांमुळे वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्यानंतर आता पुन्हा प्रशासनाने दुसऱ्यांदा ठिय्यांचा लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. जिल्ह्यातील नद्यांचा विचार करता प्रशासनाने बारा ठिकाणी वाळूचे ठिय्ये निश्चित केले असून, त्यासाठी गेल्या महिन्यात जाहीर लिलाव पुकारण्यात आला होता. आॅनलाइन पद्धतीने होणाऱ्या या लिलावात फक्त एकाच ठेकेदाराने सहभागी होत मालेगाव तालुक्यातील तीन ठिय्यांसाठी बोली लावली तर अन्य नऊ ठिय्यांसाठी एकही ठेकेदार पुढे आला नाही. वाळूचा उपसा व त्यासंदर्भात करावी लागणारी पूर्तता पाहता नियम, अटींच्या जोखडात वाळूची कायदेशीर वाहतूक करणे अवघड झाल्याने ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. आता पुन्हा एकदा वाळू ठिय्यांचा ई-लिलाव काढण्यात आला आहे.

Web Title: Sand stitches for a second time