शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील अभयारण्यांचे द्वार ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:11 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर विविध जिल्ह्यांमधील स्थिती लक्षात घेऊन टप्पेनिहाय तेथील व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, नाशिक वनवृत्तामधील निफाड तालुक्यातील रामसर दर्जाचे नांदूर-मधमेश्वर, अहमदनगरचे कळसूबाई-हरिश्चंद्रगड, जळगावचे यावल आणि धुळ्याचे अनेर डॅम अशा चारही अभयारण्यांमध्ये पर्यटकांसह निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकारांना अभयारण्यांच्या नाक्यांवर तपासणी करून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सध्या नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षणाचा हंगाम नाही, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. मात्र, वर्षा सहलींसाठी कळसूबाईसह अन्य अभयारण्यांमध्ये पर्यटक वाढण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या रोजगाराला चालना मिळावी, या उद्देशाने अभयारण्यांचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले केले जात असल्याचे अंजनकर यांनी सांगितले.

---इन्फो--- भंडारदऱ्याला वाढणार पर्यटकांचा ओघ पावसाळ्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची संख्या वाढलेली असते. पांजरे, उडदावणे, घाटघर, रतनवाडी या भागांत वन्यजीव विभागाने स्वच्छतागृहांची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जाऊ नये. अभयारण्यात पावसाळी पर्यटन करताना धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढू नये. जागोजागी लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.

---कोट---

कोरोनामुळे गेल्या वर्षी पर्यटनाचा सर्वच हंगाम पाण्यात गेला होता. पावसाळ्याचे चार महिने, तसेच काजवा महोत्सवदेखील झाला नव्हता. यावर्षी किमान पावसाळ्याच्या हंगामात पर्यटनामुळे स्थानिकांना लाभ होण्यास मदत होणार आहे. रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होईल. वनखात्याने अभयारण्यांमध्ये परवानगी दिल्याने धबधबे बघण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे, तसेच अजून आठवडाभर काजव्यांची चमचमही अभयारण्यात अनुभवायास येऊ शकते.

-केशव खाडे, गाईड, भंडारदरा

---

फोटो आर वर ०८कळसूबाई१/२