शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

पक्षांतर्गत विरोधकांना सानप यांचा दणका

By admin | Updated: August 30, 2016 01:52 IST

गुन्हेगारांना आश्रय : नेतृत्वावर शिक्कामोर्तब

मंचर : बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन सुरू असताना तलाठी पंचनामा करण्यास गेले असता त्यांच्यावर दगडाने हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उत्खननाचे फोटो मोबाईलमध्ये काढण्यात आल्याने मोबाईलही फोडण्यात आला. ही घटना शेवाळवाडी गावच्या हद्दीत रात्री पावणेअकरा वाजता घडली. याप्रकरणी सागर नवनाथ थोरात, जेसीबी व डंपर चालकाविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचरचे गावकामगार तलाठी हेमंत भागवत यांना तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी फोनवरून कळविले, की मंचर हद्दीत गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी बेकायदा बिगरपरवाना मुरूम उत्खनन सुरू आहे. त्यानंतर भागवत गोरक्षनाथ टेकडीच्या पायथ्याशी रात्री गेले. त्या वेळी पेठ येथील तलाठी उद्धव चव्हाण तेथे आले. दोघांनी पाहणी केली असता जेसीबीद्वारे मुरूम काढून तो डंपरमध्ये भरला जात होता. तलाठी चव्हाण यांनी त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले. जागामालक कोण आहे अशी चौकशी करत असताना सागर नवनाथ थोरात हा पुढे आला.तुमच्याकडे मुरूम उत्खननासाठी परवाना आहे का, अशी चौकशी केली असता, थोरात यांनी परवाना नसल्याचे सांगितले. तुम्ही बेकायदेशीरपणे मुरूम काढत आहात, जेसीबी डंपर पोलीस ठाण्यात घ्या, असे तलाठी यांनी सांगितले. त्या वेळी थोरात यांना राग आला. तलाठी भागवत व चव्हाण यांना अरेरावी करण्यात आली. तुमची कामाची वेळ सकाळ ते संध्याकाळ आहे, रात्रीची नाही, आम्ही जेसीबी, डंपर पोलीस ठाण्यात घेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कोणी काही करू शकत नाही, असे म्हणून सागर थोरातने दोघांना शिवीगाळ दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिली.सागर थोरातने तेथील दगड दोन्ही हाताने उचलून जिवे मारण्याच्या उद्देशाने तलाठी चव्हाण यांच्या डोक्यात घालणार, तेवढ्यात चव्हाण यांनी दगडाचा घाव चुकविल्याने त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर दगड लागून किरकोळ जखम होऊन त्यांना मुकामार लागला आहे. तलाठी चव्हाण यांनी मोबाईलच्या साह्याने काढलेले फोटो नष्ट करण्याच्या उद्देशाने सागरने मोबाईलवर दगड मारून नुकसान केले. सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी तलाठी हेमंत भागवत यांनी पोलिसांत फिर्याद दिली. (वार्ताहर)